Vayoshree yojna Govenment Scheme:’लाडकी बहिण’ योजनेचा राज्यातील लाखो महिलांनी फायदा घेतला. यानंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आणली. पण सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना आणली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहिणीची गाव गावानुसार लाभार्थी यादी नाव
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच त्यांना भेडसावणाऱ्या अपंगत्व आणि दुर्बलतेवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य यामाध्यमातून पुरवले जाते.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकरकमी 3 हजार रुपये जमा केले जातात. या योजनेसाठी 2024-2025 या वर्षासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाडकी बहिणीची गाव गावानुसार लाभार्थी यादी नाव
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेच्या लाभार्थ्यांना चष्मा, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कंबर बेल्ट, स्टिक व्हीलचेअर, सर्व्हायकल कॉलर, कमोड चेअर, गुडघ्याचे ब्रेस, श्रवणयंत्र इ .वस्तू पुरवल्या जातात.
वयोश्री योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 65 वर्षे आणि त्यावरील नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
लाडकी बहिणीची गाव गावानुसार लाभार्थी यादी नाव
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा पुरावा, स्वत: घोषित ओळखपत्र यासाठी इतर कागदपत्रे लागतील.
वयोश्री योजनेसाठी पात्र अर्जदारांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.