विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. एकूण 288 मतदारसंघांपैकी 224 मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA Alliance) अवघ्या 58 जागांवर विजय मिळेल, असे दिसत आहे.

महाराष्ट्रातील विजयी आमदाराची यादी

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा मविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीमध्ये भाजप 133, शिंदे गटाला 56 आणि अजित पवार गटाला 39 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 19, काँग्रेसला 20 आणि शरद पवार गटाला अवघ्या 15 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, मुंबईतही महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मिळून एकूण 36 मतदारसंघ आहेत.

महाराष्ट्रातील विजयी आमदाराची यादी

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये वरळीतील जागेवरुन आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. तर माहीममध्ये अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला. या मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. हा राज ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रचंड मोठा धक्का ठरला आहे. तर उद्धव ठाकरे यांनाही मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मोजके अपवाद वगळता ठाकरे गटातील मुंबईतील बहुतांश उमेदवारांचा पराभव झालेला आहे.

महाराष्ट्रातील विजयी आमदाराची यादी

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment