Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल

Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता.

Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. नवरदेवाच्या जेम्स बॉण्ड स्टाईलने लग्नमंडपातील पाहुण्यांनाच नव्हे तर इंटरनेटवर नेटकऱ्यांनाही थक्क केलं आहे. कारण घोडेस्वारी करणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यातून पैशांची माळ चोरणाऱ्या चोरट्याला नवरदेवाने धू-धू धुतलं. विशेष म्हणजे नवऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

मेरठच्या डुमरावलीमध्ये एका लग्नसोहळ्यात असं काही घडलं, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. नवरदेव घोड्यावर बसून मंदिरात जात होता. त्यावेळी नवदेवाच्या गळ्यात पैशांची माळ टाकण्यात आली. पण त्याचदरम्यान एका चोरट्याने नवरदेवाच्या गळ्यातील पैशांची माळ चोरली अन् एका लोडर गाडीत लपून बसला. त्यानंतर नवऱ्याने फिल्मी स्टाईलने धूम ठोकली आणि चोरट्याला पकडलं.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, नवरदेव धावत्या लोडर गाडीच्या आत जाऊन चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी गाडी थांबवून ड्रायव्हर चोरटा पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याआधीच नवरदेव त्या चोरट्याला पकडतो आणि त्याची चांगलीच धुलाई करतो. व्हिडीओच्या शेवटी पाहू शकता की, सुपरमॅन नवरदेवामुळे या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा एक फिल्मी सीन आहे. तर अन्य नेटकऱ्याने म्हटलं, नवरा खूप धाडसी आहे. तर काही नेटकऱ्यांनी याला धोकादायक स्टंटबाजी म्हटलं आहे. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं, मेरठ का स्वॅग..

 

Leave a Comment