लाडकी बहीण योजनेचे 2100 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा November 25, 2024 by Atul Ladki Bahin Yojana installment : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली. लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर यादीत नाव पहा या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते (७,५०० रुपये) पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत. लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर यादीत नाव पहा महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला २,१०० रुपये दिले जातील. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत (२८८ पैकी २३५ जागा) मिळालं असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे. तसेच, आगामी हप्त्याद्वारे १५०० रुपये दिले जाणार की २१०० रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.